साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सोमवारी, १६ ऑक्टोबर रोजी स्व. संदीप चव्हाण राज्यस्तरीय वरिष्ठ व कनिष्ठ आंतर महाविद्यालयीन सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन रोशन केवलसिंग कच्छवा (सहाय्यक आयुक्त IRS,C&IT) यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे चेअरमन डॉ.विनायक चव्हाण असतील.
स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. समारोप प्रमोद हिले (उपविभागीय अधिकारी चाळीसगाव), प्रशांत पाटील (तहसीलदार, चाळीसगाव) यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळासाहेब विश्वासराव चव्हाण (सचिव, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड, चाळीसगाव) असतील.
स्पर्धेचे उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे पदाधिकारी, व्हा.चेअरमन पुष्पा भोसले, सहसचिव रावसाहेब जयवंतराव साळुंखे, संचालक मंडळ, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे सभासद, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच राज्यातील विविध महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील संघ उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे प्रायोजकत्व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि संस्थेचे सचिव बाळासाहेब विश्वासराव चव्हाण यांनी स्वीकारले आहे. प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव, उपप्राचार्या डॉ. उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ. जी.डी.देशमुख, स्पर्धा समन्वयक डॉ.के.बी.बेंद्रे यांनी स्पर्धेसाठी स्पर्धकांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक फिरता चषक रुपये ५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक २ हजार रुपये आणि प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ उत्कृष्ट स्पर्धक विद्यार्थी पाचशे रुपये आणि उत्कृष्ट स्पर्धक विद्यार्थिनी पाचशे रुपये आणि सहभागी प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.