साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
बसमध्ये चढत असलेल्या वृध्दाच्या खिश्यातून रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
भिमराव सोनू बिऱ्हाडे (वय ६८ , रा.देवपूर, धुळे) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामानिमित्त ते ११ ऑक्टोबर रोजी अमळनेर शहरात आलेले होते. काम आटोपून दुपारी १ वाजता अमळनेर येथील बसस्थानकात आले. अमळनेर ते दोधवड (हिंगोणा) बसमध्ये चढत असतांना संशयित महिला आरोपी संगिता विष्णू लोढे (रा. चाळीसगाव) आणि इतर अनोळखी दोन महिलांनी भिमराव बिऱ्हाडे यांच्या शर्टाच्या खिश्यात मागून हात घालून ६०० रूपयांची रोकड लांबविल्याचे समोर आले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलेला पकडले त्यात महिलेने नखाने त्यांना ओरबडले. इतर दोन महिला फरार झाल्या. याप्रकरणी त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महिला संगिता लोढे हिच्यासह इतर दोन अनोळखी महिलांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. चंद्रकांत पाटील करीत आहे.