साईमत, जामनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद आणि जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शासकीय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे ९ ते ११ ऑक्टोबरमध्ये घेण्यात आल्या. त्यात १७ व १९ वर्षाच्या आतील गटात इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडू मुला-मुलींनी घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे १० खेळाडु नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सर्व खेळाडूंचा महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक तथा जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.विजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा डॉजबॉल असो. चे सचिव योगेश सोनवणे, सचिन महाजन, इंदिराबाई ललवाणी विद्या.चे क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार आदी उपस्थित होते.
सर्व यशस्वी खेळाडूंना इंदिराबाई ललवाणी विद्या.चे क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गर्शन लाभले. यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन. मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे यांनी कौतुक केले आहे.
जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचा निकाल असा- १७ वर्षाच्या आतील मुलांमध्ये ११० मी. हर्डल्य प्रथम सुमित चिंचोले (इयत्ता अकरावी), बांबू उडी : द्वितीय सचिन गव्हांडे (दहावी), बांबू उडी : तृतीय कन्हैया पवार (दहावी), १७ वर्षाआतील मुलींमध्ये बांबू उडी : द्वितीय सलोनी न्हावी (दहावी), बांबू उडी : तृतीय श्रद्धा शिंदे (दहावी), १९ वर्षाआतील मुलांमध्ये थाळी फेकमध्ये प्रथम इंद्रजित गोसावी (इ. अकरावी), ४०० मी. हर्डल्स प्रथम विनायक सपकाळे (इ.१२ वी), ५ कि.मी.चालणे : तृतीय हर्षल पांढरे (इ.११ वी), ४ ४०० मी. रिले : तृतीय नितीन बोरसे, शुभम पवार, विनायक सपकाळे, श्रीओम देशमुख, १९ वर्षाआतील मुलींमध्ये क्रॉस कंट्री प्रथम पूनम देशमुख, अंजली पंडित, अश्विनी पवार, उमा महाजन, बांबू उडी : द्वितीय उमा महाजन (इ.१२ वी), उंच उडी : द्वितीय गायत्री सूनसकर (इ.१२ वी), ४०० मी.हर्डल्य तृतीय पूनम देशमुख (इ.११वी), तिहेरी उडी तृतीय साक्षी माळी (इ.११वी), थाळी फेक: तृतीय अश्विनी पवार (इ.११ वी) यांचा समावेश आहे. त्यातील प्रथम आणि द्वितीय स्थानी प्राप्त केलेल्या खेळाडूंची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.