साईमत, भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालयातील नंदिनी लक्ष्मण सूर्यवंशी (वयोगट १७-४८ किलो), पायल गोविंदा सूर्यवंशी (वयोगट १७-६० किलो) तसेच कृष्णा सुनील पाटील (वयोगट १९-५० किलो) यांनी क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे तथा जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत प्रथमस्थान पटकावले आहे. त्यामुळे त्यांची नाशिक येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच याच स्पर्धेत भावेश जितेंद्र पाटील (वयोगट १४-५० किलो), पूजा भक्तराज महाजन (वयोगट १७-४४ किलो) यांनी उपविजेतेपद प्राप्त करत यश संपादन केले आहे.
यशस्वी खेळाडुंना कार्यवाहक रघुनाथ पाटील, आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, सुनील पहेलवान, गोविंदा सूर्यवंशी, लक्ष्मण सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.