साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स अँड के.के.सी. कॉमर्स कॉलेजला जागतिक मानसिक आरोग्य दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डी. एल. वसईकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आशिष राठोड उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. के. एस. खापर्डे, डॉ. सुनिता कावळे, प्रा. सुनीता जगताप यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात सुनीता जगताप यांनी मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व व उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉ. आशिष राठोड यांनी विविध मानसिक आजारांची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी काही ध्यान तंत्राबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एल. वसईकर यांनी मनोगतात शारीरिक, मानसिक आरोग्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांमधील ‘ताण तणाव’ विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रिना वानखेडे हिने तर प्रा. हितेश भोसले यांनी आभार मानले.