Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»युवारंगचे २०२३ चे विजेतेपद मू.जे.महाविद्यालयाला
    जळगाव

    युवारंगचे २०२३ चे विजेतेपद मू.जे.महाविद्यालयाला

    SaimatBy SaimatOctober 11, 2023No Comments6 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा समारोप मोठ्या जल्लोषात झाला.

    दि.७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात युवारंग युवक महोत्सव झाला. बुधवारी सिने कलावंत सुरभी हांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अध्यक्षस्‍थानी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे उपस्थित होते. यावेळी के.सी.ई. संस्थेचे पदाधिकारी ॲङ प्रविणचंद्र जंगले, ज्ञानदेव पाटील, भालचंद्र पाटील, प्राचार्य ए. आर. राणे तसेच कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, प्रा.एस.टी.भुकन, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, डॉ. पवित्रा पाटील, सीए रवींद्र पाटील तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य स.ना. भारंबे, समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे, डॉ. मनोज महाजन यांची उपस्थिती होती.

    यावेळी बोलतांना सुरभि हांडे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विविध प्रश्नांना उत्तरे देतांना त्या म्हणाल्या की, आयुष्यात खुपदा संधी प्राप्त होत असते. नेमकी संधी कोणती हे कळायला हवे. स्वत:शी स्पर्धा करा. आज केलेल्या अभिनयापेक्षा अजून काय उत्तम करता येईल याचा मी विचार करत असते. लहान गावातून मुंबईत गेल्यानंतर करीअर करतांना पुन्हा गावाकडे परतायचे नाही हे डोक्यात ठेवा. स्पर्धेतील सहभागामुळे आत्मविश्वास वाढतो. सोशल मिडीयाचा फायदा तरूण पिढीला होत आहे. मी मूळजी जेठा महाविद्यालयात शिकत असतांना शिक्षकांकडून खूप काही शिकले. त्याच महाविद्यालयात माझे कौतुक होत आहे याचा खुप आनंद आहे असे त्या म्हणाल्या.
    आ. सुरेश भोळे यांनी महाविद्यालयात शिकतांना उत्तम गुण घेवून पदवी प्राप्त करा आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. मात्र स्वत:मधील कलेचा विकास करा. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचा आदर्श घ्यावा. इच्छाशक्ती असेल तर यश गाठता येथे असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी या महोत्सवात तरूणांनी सादर केलेले कलाविष्कार बघता ही पिढी विचार करणारी आणि व्यक्त होणारी आहे. असे सांगून यश अपयशाची पर्वा न करता स्पर्धांमध्ये सहभागी होत रहा असे आवाहन केले. स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी स्वयंशिस्त महत्वाची असून वेळेचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी महोत्सवाचा आढावा घेतांना या महोत्सवात ११८९ सहभागी विद्यार्थ्यांपैकी ४७५ विद्यार्थी व ७१३ विद्यार्थिंनींचा सहभाग होता असे सांगितले.

    यावेळी संघ व्यवस्थापकांच्या वतीने डॉ. नलिनी पाटील, प्रा. अजबराव इंगळे, प्रा. सरीता पाडवी, विद्यार्थी कलावंतांच्या वतीने सायली महाजन, अपुर्वा शहा, धर्मेश हिरे व क्रांती मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील कलावंत व मु.जे. महाविद्यालयातील प्रा. हेमंत पाटील यांचा प्र-कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर व प्रा. योगेश महाले यांनी केले. समन्वयक प्रा. जुगलकिशोर दुबे यांनी आभार मानले.

    कार्यक्रमास अधिसभा सदस्य प्राचार्य के.बी. पाटील, प्राचार्य सुनील पाटील, प्राचार्य सुनील पवार, प्रा. पदमाकर पाटील, प्रा. संदीप नेरकर, प्रा. गजानन पाटील, प्रा. जयवंत मगर, प्रा. अजय पाटील, अमोल मराठे, सुनील निकम, अमोल सोनवणे, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, नितीन ठाकूर, भानुदास येवलेकर, नेहा जोशी, दीपक पाटील, डॉ. ऋषिकेश चित्तम, डॉ. संजय पाटील, प्रा. मंदा गावित, यांच्यासह विद्या परिषदेचे व विविध प्राधिकरणाचे सदस्य व प्राचार्य गौरी राणे, प्राचार्य अनिल पाटील, प्राचार्य एस.आर. पाटील, संघ व्यवस्थापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध समिती सदस्य्, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

    युवारंग स्पर्धेचा निकाल

    संगीत विभाग
    शास्त्रीय वादन(स्वरवाद्य):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (तृतीय)
    शास्त्रीय वादन (तालवाद्य):- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), महात्मा गांधी शि.मंचे कला, वाणिज्य विज्ञान महा., चोपडा (तृतीय)
    शास्त्रीय गायन:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), , प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय) , पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय)
    लोकसंगीत (वाद्यवृंद):- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
    समुह गायन (भारतीय):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (व्दितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)
    सुगम गायन (भारतीय):- प्रताप महाविद्यालय,अमळनेर (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (तृतीय)
    नाट्य संगीत:- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय)
    समुह गायन (पाश्चिमात्य):- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मंचे कला, वाणिज्य विज्ञान महा., चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
    पाश्चिमात्य वाद्यसंगीत:- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ मु.जे.महाविद्यालय (तृतीय)
    पाश्चिमात्य गायन :- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय)
    नृत्य विभाग
    ­­­­शास्त्रीय नृत्य:- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (द्वितीय), आर.सी.पटेल इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट,शिरपूर (जि. धुळे) (तृतीय)
    समुह लोकनृत्य:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (द्वितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)
    वाड्मयीन (साहित्य) कला
    वादविवाद:- विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय)
    वक्तृत्व:- विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे (प्रथम), पु.ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), आर.सी.पटेल इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट,शिरपूर (जि. धुळे) (तृतीय)
    रंगमंचीय कला प्रकार (नाट्य कला )
    मुकअभिनय:- मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (व्दितीय), पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालय, शहादा (तृतीय)
    मिमिक्री:- मु.जे.महाविद्यालय, जळगाव (प्रथम), चोपडा एज्‍युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, चोपडा (द्वितीय), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव (तृतीय)
    प्रहसन:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे (नकाणे),धुळे (प्रथम), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (व्दितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)
    ललित कला
    व्यंगचित्र:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), ए.आर.बी. गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी (व्दितीय), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय) , क्ले मॉडेलिंग:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), गजमल तुळशीराम पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय) , कोलाज:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव (द्वितीय), एस.एस.व्ही.पी.एस.चे भाऊसाहेब एन.एस. पाटील आर्टस् आणि एम.एफ.एम.ए. कॉमर्स कॉलेज, धुळे (तृतीय) , इन्स्टॉलेशन:- बी.पी.आर्टस, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय) , मेहंदी:- पूज्य सानेगुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, शहादा (प्रथम), आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय), आर.सी.पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिरपूर (तृतीय), फोटोग्राफी:- पी.टी.सी. एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा (प्रथम), पूज्य सानेगुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, शहादा (द्वितीय), कै. अण्णासाहेब आर.डी.देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी (तृतीय) , पोस्टर मेकींग:- मु.जे. महाविद्यालय, जळगाव (प्रथम), महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तृतीय) , रांगोळी:- जी.एच. रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड बिझीनेस मॅनेजमेंट, जळगाव (प्रथम), आर.सी.पटेल इन्स्टीटयुट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपूर (जि. धुळे) (द्वितीय), कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा कोकोडा (तृतीय). स्पॉट पेंटिग:- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय,जळगाव(व्दितीय), किसान कल, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,पारोळा (तृतीय)
    जिल्हानिहाय प्रोत्साहनपर फिरतेचषक जळगाव जिल्हा (डॉ.अरविंद चौधरी पुरस्कृत स्व.वसुंधरा चौधरी फिरता चषक )  महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, चोपडा
    धुळे जिल्हा (प्रा.मुक्ता महाजन पुरस्कृत स्व.शांताबाई महाजन फिरता चषक ) : विद्यावर्धिनी संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे नंदुरबार जिल्हा (प्रा.सुनील कुलकर्णी पुरस्कृत स्व.बाबुराव कुलकर्णी देशगव्हाणकर फिरता चषक ) पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, शहादा सर्वसाधारण विजेतेपद विजेता  : के.सी.ई. सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय, जळगाव  (डॉ. जी.डी.बेंडाळे स्मृती चषक) उपविजेता  : प्रताप महाविद्यालय, अमळनेर  (कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी स्मृती चषक)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jagnade Maharaj : जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव, बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

    December 21, 2025

    Parola : अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम

    December 21, 2025

    healthy life : सातत्य, सकारात्मक विचार, सजगता निरोगी जीवनाचे गमक

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.