साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तमगव्हाणला जि.प. प्राथमिक शाळेत शासनाच्या उमेद अभियानातंर्गंत जिजाऊ महिला ग्रामसंघातर्फे बचत गटांनी महिला आनंद मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यासाठी १० महिला बचत गटांनी स्वत: खाद्यपदार्थ बनविले होते. विविध खाद्यपदार्थ बनवून महिलांनी स्टॉल लावले होते. मेळाव्याचे उद्घाटन शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन स्टॉलवरील पदार्थांचा स्वाद घेतला.
यावेळी माजी जि.प. सदस्या मंगला पाटील, तमगव्हाणच्या सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच अरुण पाटील, पिंपळवाडच्या सरपंच शोभा नागरे, उमेद अभियानच्या तालुका समन्वयक विद्या भांबळे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गायकवाड, प्रवीण पाटील, कैलास वाघ, माजी सरपंच माधवराव पाटील, शिवदास पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्षा अर्चना पाटील, पोलीस पाटील केशवराव पाटील, पाटखडकी जि.प शाळेच्या उपशिक्षिका संध्या बागुल, बँकसखीच्या ममता देसले, चाळीसगाव तालुक्यातील टाकळी, ब्राह्मणशेवगे, देवळी, मुंदखेडे, पातोडा, बोरखेडा, उंबरखेड, मांदुर्णे अनेक गावांमधील सीआरपी, तमगव्हाण गावातील महिला बचत गटाच्या महिला, नागरिक, उपस्थित होत्या.
यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य संभाजी पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी तमगव्हाण ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक तमगव्हाणच्या सीआरपी पूनम पाटील, सुत्रसंचालन ग्रामसेविका सुवर्णा शेवाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी रत्नाकर पाटील, प्रवीण (पप्पू) पाटील, संभाजी गायकवाड यांच्यासह गावातील सर्व महिला बचत गटांच्या महिलांनी परिश्रम घेतले.