साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील नेरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गंत नांद्रा उपकेंद्र येथे आयुष्यमान भव: कार्यक्रमामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्या आदेशावरून तसेच जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रा आणि रोटवद येथे महिलांच्या विविध आजारांविषयी मार्गदर्शन शिबिर नुकतेच घेण्यात आले.
शिबिरात मार्गदर्शनासाठी आलेल्या डॉ.सीमा तडवी यांचा गावाच्यावतीने रोटवद ग्रा.पं.च्या सदस्या सीमा बाविस्कर आणि माध्यमिक शाळेच्यावतीनेही सत्कार करण्यात आला. नांद्रा येथे ज्येष्ठ महिला सरूताई यांच्याकडून सत्कार करण्यात आला. डॉ.सीमा तडवी यांनी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शिबिरात किशोरवयीन मुलींसह महिलांनी सहभाग नोंदविला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी रोटवदचे सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बाविस्कर, ग्रामपंचायत सदस्य सीमा बाविस्कर, बचत गटाचे अध्यक्ष, नांद्राचे सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिवाकर पाटील, अविनाश वाघ, गावातील आशा स्वयंसेविका, बचत गटाचे अध्यक्ष, महिलांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार रवींद्र सूर्यवंशी यांनी मानले.