साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय व रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयातील सेमिनार हॉल येथे ‘युगपुरुष स्वामी विवेकानंद’ खान्देशस्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात त्यांनी ‘युवकांचे प्रेरणास्थान : स्वामी विवेकानंद’, ‘सोशल मिडीया आणि आजचा युवक’, ‘शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी’, ‘राजकारणाची दशा आणि दिशा’ विषयांवर वक्तृत्व सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन भगिनी मंडळाच्या अध्यक्षा तथा कबचौ उमवि सिनेट माजी सदस्या पूनम गुजराथी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. त्यानंतर एमएसडब्ल्यू प्रथम वर्षाची विद्यार्थिनी अंकिता कोळी आणि अश्विनी कोळी यांनी सुरेल असे स्वागतगीत सादर केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून, कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, पंकज समुहाचे संचालक पंकज बोरोले, शारदा मॅथ्स क्लासेसचे संचालक गौरव महाले, स्पर्धा समन्वयक युवा वक्ते प्रा.सतिश अहिरे, परीक्षक म्हणून एस.बी पाटील, प्रितम निकम (शहादा) आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. भगिनी मंडळाच्या सहसचिव अश्विनी गुजराथी, व्याख्याते प्रा.संदीप पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी, डॉ.विष्णू गुंजाळ, डॉ.अनंत देशमुख, प्रा.नारसिंग वळवी, डॉ.विनोद रायपुरे, डॉ.राहूल निकम, प्रा.डॉ.मारोती गायकवाड, डॉ.उत्तम सोनकांबळे, डॉ.मोहिनी उपासनी, प्रा.डॉ.संबोधी देशपांडे, ग्रंथपाल प्रा.कल्पना सोनवणे, सहाय्यक ग्रंथपाल प्रा.रूपाली देसाई, लेखापाल अमोल गुजराथी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी, प्रा.नारसिंग वळवी, अनिल बाविस्कर, सदस्य प्रा.गोपाल बडगुजर, लक्ष्मण पाटील, ऋषीकेश धनगर, अरुण भोई, डिगंबर धनगर, कल्याणी महाजन, ॲड.सुयश ठाकुर, अजय शिरसाठ, योगेश कोळी, उज्ज्वला वाघ, संजना कंखरे, राहुल कोळी, दीपक भालेराव, रोहित रायसिंग यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष तथा आयोजक अनिल बाविस्कर, सूत्रसंचालन प्रा.गोपाल बडगुजर तर लक्ष्मण पाटील यांनी आभार मानले.
स्पर्धेतील विजयी स्पर्धक असे
स्पर्धेतील विजयी स्पर्धकांमध्ये प्रथम अमोल पाटील (पारितोषिक, रोख दोन हजार रूपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), द्वितीय सागर कोळी (पारितोषिक, रोख पंधराशे रूपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), तृतीय कार्तिका चौधरी (पारितोषिक, रोख एक हजार रूपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), उत्तेजनार्थ सुमीत महाजन, जागृती बारी, प्रियंका बारी, करीना शंभरकर, रोशनी पाटील, हिना आहुजा, परेश पाटील, प्रणिता मोतीराळे (पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.