साईमत, जळगाव : प्रतिनिधी
राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या २ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले समाजबांधव रोशन राजपूत आणि गिरीश परदेशी यांना पाठिंबा देण्यासाठी पिंप्राळा परिसरातील राजपूत समाज व शोभाराम प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड संघटनेच्यावतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. सुरवातीला पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर रॅलीस सुरवात झाली. नंतर महाराणा प्रतापाच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. तेथून रॅली शिवतीर्थावर शिवरायांना अभिवादन करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. सर्वांच्यावतीने उपोषणकर्त्या समाजबांधवांना स्वाक्षरी केलेले पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही सर्वांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी पिंप्राळ्यातील राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष देवसिंग राजपूत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव निलेश राजपूत, रघुनाथ पाटील, प्रदीप पाटील, भरतसिंग पाटील, नरसिंग पाटील, जितेंद्रसिंग पाटील, भैय्या पाटील, हरसिंग पाटील, विठ्ठल राजपूत, प्रदीपसिंग पाटील, ग. स. सोसायटीचे उपाध्यक्ष अजबसिंग पाटील, के.आर.पाटील, शोभाराम प्रतिष्ठानचे संस्थापक नरेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक विजयसिंग पाटील, पूनमचंद पाटील, लालसिंग पाटील, रवि राजपूत, गौरव पाटील, पी. टी. पाटील, मयूर चौधरी, प्रफुल्ल पाटील, सुधाकर भावसार, सुमेरसिंग पाटील, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.