शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल कापूस लुटणाऱ्या जग्गू डॉन नारखेडे व राजेंद्र पाटील यांच्याविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

0
89

मलकापूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा हजारो क्विंटलचा कापूस चढ्या भावाने घेऊन शेतकऱ्यांंची फसवणूक करणाऱ्या जग्गू डॉन नारखेडेसह दोन आरोपींची लेखी तक्रार मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी अतुल मधुकर पाटील (वय ४२) रा. कुंड बु. ता.मलकापूर यांनी १५३ क्विंटल ४० किलो कापूस हा प्रति क्विंटल ९००० रुपये प्रमाणे एकूण रक्कम १३ लाख ८० हजार ६०० रुपयाचा कापूस भरून नेला व त्यादिवशी त्यांनी १ लाख ६६ हजार ६५० रुपये नगदी रोख दिले व उर्वरित रक्कम रुपये १२ लाख १३ हजार ९५० इतकी राहिलेली रक्कम २० दिवसाच्या करारावर देऊ असे कबूल केले.त्यानंतर अतुल पाटील यांनी आरोपी जगन उर्फ जग्गू रामचंद्र नारखेडे , राजेंंद्र पांडुरंग पाटील ,शरद विष्णू बोरोले या तिघांना पैशाकरिता तगादा लावला असता त्यांंनी मला १२ लाख १३ हजार ९५० रुपयाचा ॲक्सिस बँकेचा चेक (क्रमांक १२११९७) दिला होता व तो चेक वटवण्याकरिता पाटील हे आयडीबीआय बंँक येथे गेले असता आरोपीच्या खात्यात पैसे नसल्यामुळे तो चेक परत मिळाला.त्यामुळे फसवणूक झाली आहे.
तर शेतकरी अतुल वासुदेव पाटील यांनी याच तीन आरोपींना ३२ क्विंटल ५८ किलो कापूस ऑगस्ट २०२३ मध्ये विकला व गावातील काही लोकांचा कापूस खरेदी केला होता. आरोपी राजेंद्र पाटील हे माझ्या गावातील असल्यामुळे त्यांना कापूस ९००० रुपये प्रति क्विंटल कापूस विकण्याचे ठरले. दि. ३ ऑगस्ट २०१३ रोजी तिन्ही आरोपी हे कापूस पाहून गेले व ९००० रुपये क्विंटल प्रमाणे भाव ठरला तर ३/८/ २०२३ रोजी घरी आले व त्यांनी वाहन आयशर डीसीएम क्र.१४ ई एल.१०७५ यामध्ये ३२ क्विंटल ५८ किलो कापूस भरून घेऊन गेले.त्याची किंमत एकूण २ लाख ९६ हजार २२० रुपये इतकी होती.२० दिवसाचे करार आरोपींनी कबूल केले व अतुल वासुदेव पाटील यांनी रक्कमेचा तगादा लावला असता आरोपीने बँक ऑफ इंडियाचा चेक (क्र.१६१६४६) दिला. तो चेक बँकेत घेऊन गेले असता आरोपीच्या खात्यात पैसे नसल्याने चेक परत मिळाला.अशाप्रकारे दोन्ही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने वरील आरोपीविरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

न्याय देण्याचा प्रयत्न करु
अशाप्रकारे शेतकऱ्यांची जग्गू डॉन नावाच्या व्यापाऱ्याने फसवणूक केली असेल त्याही शेतकऱ्यांंनी आमच्याकडे यावे. त्याची दखल घेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
– ॲड.दिलीप बगाडे, मलकापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here