साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गणेश उत्सव आणि ईद हे सण नुकतेच शांततेच्या वातावरणात पार पडले. त्यासाठी नागरिकांसह पोलीस दलाने सामोपचाराने प्रयत्न केले. तसेच पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवला. त्यासाठी रुख्मिणी फाउंडेशन मिडटाऊन आणि ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीकडून सत्कार करुन अभिनंदन पत्र देण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, पो.नि.जि विशेष शाखा, पोलीस निरीक्षक अभिमान सोनवणे, राखीव पो.नि.पोलीस उपनिरीक्षक रेशमा अवतारे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी तसेच पंकज जैन, डॉ.विजय साखंला, विजय झांबड, शितल जैन, कमलेश डांबरे, प्रियेश छाजेड आदी उपस्थित होते.



