साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
यशस्वी होण्यासाठी कोणताही कानमंत्र नव्हे तर कठोर परिश्रम हेच तंत्र असते, असे प्रतिपादन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रा. रमेश आवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. श्याम भगवानदास अग्रवाल सर्वांगीण विकास मंडळाच्यावतीने गुरुवारी, ५ ऑक्टोबर रोजी स्व. शाम अग्रवाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ.बं.हायस्कूलमधील १०० विद्यार्थ्यांना शालेय भेट वस्तूचे वाटप केले. त्याप्रसंगी ते बोलत होत. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण होते.
ॲड.प्रदीप अहिरराव यांनीही मंडळाच्या उपक्रमाबाबत माहिती देतांना मैत्री कशी असते, याबद्दल उपस्थितांना सांगितले. योगेश अग्रवाल यांनी संपूर्ण मित्र मंडळ हे अग्रवाल परिवाराचा एक अविभाज्य घटक आहे, असे सांगत मंडळाचे कार्य खूपच उल्लेखनीय, प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मैत्री बनवून ती कशी टिकविता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे सांगितले. मंडळाच्या माध्यमातून झालेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, जलसंधारण, पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी आ.बं. हायस्कूलमधील १०० मुला-मुलींना शालेय भेट वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य सूर्यकांत शिनकर, सुभाष जैन, उमेश मराठे, मिलिंद देशमुख, सुधाकर कुमावत, रमेश रोकडे, जितेंद्र वाणी, विशाल कांबळे, दिलीप चित्ते, मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना इंगळे, उपमुख्याध्यापक पी.डी. येवले, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक के.एन.तडवी, उपमुख्याध्यापक बी.बी.सोनवणे, प्रवीण राजपूत, शशिकांत गुंजाळ, दिनेश महाजन, सीमा माळकर, मनोहर सूर्यवंशी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मंडळाचे सचिव रमेश जानराव, सूत्रसंचलन अनंत सातपुते तर आभार उपमुख्याध्यापक पी.डी. येवले यांनी मानले.