नवीदिल्ली : मोदी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत कोट्यवधी लाभार्थ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या सबसिडीमध्ये २०० रुपयांऐवजी ३०० रुपये एवढी वाढ केली आहे म्हणजेच उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना ६०० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे.३७ दिवसांत मोदी सरकारने दुसऱ्यांदा दर कमी केले आहेत.ज्याचा फायदा १० कोटी लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. तत्पूर्वी २९ ऑगस्टला सरकारने २०० रुपये गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते. ज्याचा फायदा देशातील सर्वच ग्राहकांना झाला होता.