साईमत जळगाव प्रतिनिधी
एकलव्य क्रीडा संकुलातील स्क्वॉश विभागकडुन गणेशोत्सवा निमीत्य स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ११ ,१४ ,१७ वर्षे व खुला अशा वयोगटात खेळविण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या विजेत्यांना नुकतेच पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे बक्षिस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, मुजेचे क्रीडा संचालक डॉ.श्रीक्रुष्ण बेलोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.रणजीत पाटील, मिनल थोरात उपस्थीत होते. सदर स्पर्धेचे आयोजन प्रशिक्षक प्रा.प्रविण कोल्हे यांनी केले होते.
स्पर्धेतील विजेते ११ वर्ष (मुले)- १) सिध्दांत शर्मा, २)रणविर खेडकर, ३)अर्णव दांडगे.१४ वर्ष (मुले)- १) अथर्व खांडरे, २) भावेश चौधरी, ३) तन्मय पाटील. १४ वर्ष (मुली)- १) संस्क्रुती चौधरी, २) पालवी मांडे, ३) मिताली पवार. १७ वर्ष (मुले) – १) खुश फालक, २) दक्षित महाजन, ३) सौम्य जैसवाल. १७ वर्ष (मुली)- १) हर्षिता पाटील, २) श्रध्दा मोरे, खुला गट (मुले)- १) शुभम शिसोदे, २) यश पाटील, ३) महेश चौधरी.