साईमत, जामनेर : प्रतिनिधी
शहरातील प्रकाश नगरातील सप्तश्रृंगी दुर्गोत्सव मित्र मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात मंडळाच्या अध्यक्षपदी अविनाश मराठे, उपाध्यक्षपदी प्रशांत चौधरी तर सचिवपदी जगदीश सोनार यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत नवरात्रीनिमित्त राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत, असे ठरविण्यात आले.
उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव मनोज महाजन, खजिनदार दीपक फिरके, सल्लागार ॲड.विनोद धनगर, सह सल्लागार म्हणून सुदाम पाटील, कार्याध्यक्षपदी कृणाल भंगाळे (भैय्या), मंडळाच्या समितीपदी मनीष पाटील तसेच सदस्यांमध्ये ॲड. महेंद्र पाटील, सचिन भंगाळे, ॲड. आशितोष चंदेले, दीपक चौधरी, सागर महाजन, निलेश माळी, सुदाम पाटील, भूषण पाटील, गणेश कोळी, गणेश माळी, विशाल राठोड, गोलू टेमकर, विपुल बरकले, विकास पाटील, चंद्रकांत तायडे, ॲड.बाबुराव चौधरी, लोकेश तेली, योगेश तायडे, पिका जोशी, समाधान गवळी, अमोल पाटील, अनिल पाटील, प्रसाद पाटील, विनोद सपकाळे, गौरव लोखंडे, अक्षय पाटील, आकाश पाटील, सागर फिरके, मनोज सपकाळे, श्रीकांत चौधरी, गणेश वरखड, पियुष तायडे, दिपतेश ठाकूर, प्रथमेश जोशी, भूषण बाविस्कर, प्रसाद महाजन, चेतन बुंदेले, किरण मराठे, चेतन फिरके, योगेश तायडे. मयूर फिरके, सूरज सपकाळे यांचा समावेश आहे.