साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा देणारे लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख वक्ते म्हणून शरद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी.डी.पाटील होते.
सुरुवातीला दोन्हीही महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांनी माल्यार्पण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन्ही विभूतींवर मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य लढ्यातील अशा महान व्यक्तींची नावे आपणास माहिती असतात. परंतु त्यांची जीवनशैली आणि त्यांची विचारसरणी जाणून घेणे गरजेचे असते, असे शरद पाटील यांनी सांगितले. लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा अवलंब विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे प्राचार्य पी. एम.कोळी यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. सूत्रसंचालन दहावीचा विद्यार्थी ज्ञानेश्वर पाटील तर आभार निखिल पाटील यांनी मानले.