साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान’ मोहिमेंतर्गत पाळधीतील गुलाबराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करून ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत महाविद्यालयाचा परिसर त्याचबरोबर गावातील बाजारपेठ, मुख्य रस्ता, पोलीस स्टेशन चौक परिसर स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगितले. त्याचबरोबर नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्यास प्रेरित केले. त्यात एन. एस. एस.च्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य यु.के फासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्वच्छता कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी संजय बाविस्कर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखली. सूत्रसंचालन प्रा.भूषण पाटील तर आभार प्रा. चंद्रशेखर काळकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.