साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस्, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस.खापर्डे, उपप्राचार्य ए. आर. मगर, उत्सव समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव, प्रा. एस. डी. भामरे, प्रा. किशोर पाटील, श्री हेमंत गायकवाड, श्री. संजय जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे यांनी मनोगतात महात्मा गांधी यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा व सदाचार त्रिसूत्रीचे महत्त्व सांगितले. तसेच गांधीवादी विचाराने प्रेरित भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे असहयोग आंदोलन, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलनातील महत्त्वाची भूमिका सांगितली. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार प्रा. अंकुश जाधव यांनी मानले.



