Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»राज्याला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार : मंत्री पाटील
    अमळनेर

    राज्याला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार : मंत्री पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 2, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केला. अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंडमधील बन्सीलाल पॅलेसमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलन भामरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

    बोधचिन्हाची निर्मिती येथील भूमीपुत्राने केली त्याचा माझ्यासारख्या भूमीपुत्राला अभिमान आहे. अतिशय उत्कृष्ट बोधचिन्ह तयार केले. बोधचिन्हाच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर खान्देशची प्रतिमा दडवली आहे. बोधचिन्ह जगात नावलौकिक करेल, अशी प्रत्येक गोष्ट घेतली आहे. अमळनेरसारख्या छोट्या गावात १९५२ साली साहित्य संमेलन झाले. प्रताप कॉलेज, प्रताप शेटजींनी पूर्वजांनी तत्वज्ञान मंदिराच्या माध्यमातून जगात प्रसिद्ध आहे. सानेगुरुजींची चळवळ येथून झाली त्याचा सर्व अभ्यास करून येथे साहित्य संमेलनासाठी परवानगी दिली. महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य संमेलन येथे होईल. असा विश्वास व्यक्त करत साहित्य संमेलन प्रत्येकाने यशस्वी करून दाखवावे, अशी अपेक्षाही मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

    खान्देशसाठी अभिमानाची बाब

    तब्बल ७२ वर्षानंतर अमळनेर येथे होणारे साहित्य संमेलन आत्मीयतेचा विषय आहे. समर्पक बोधचिन्ह उपलब्ध करून दिले. अमळनेर सांस्कृतिक राजधानी आहे. संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, सानेगुरुजी कर्मभूमी, प्रताप शेठ व हशीम प्रेमजी यांची उद्योगभूमी शाळेची पायरी न चढणाऱ्या बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला दिले ही जगातली अद्भुत घटना आहे. बहिणाबाईंनी आपल्या कवितांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले आहे. मातृभाषेतून शिक्षण परिपक्व करते. मातृभाषेचे खूप महत्त्व आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पाच अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध केले आहेत. मराठी साहित्य संमेलन श्वास आहे. खान्देशसाठी अभिमानाची बाब असल्याचे बोधचिन्हाचे उद्घाटक कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी म्हणाले.

    परमेश्वराने सेवा करून घेतल्याचा आनंद

    बोधचिन्ह साकारणारे प्राचार्य मिलन भामरे यांनी बोधचिन्हाबाबत थोडक्यात माहिती दिली. मी अमळनेरचा आहे माझ्याकडून परमेश्वराने ही सेवा करून घेतली असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, शिरीष चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.

    यांची होती उपस्थिती

    याप्रसंगी नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, शामकांत भदाणे, रमेश पवार, सोमनाथ ब्रम्हे, प्रदीप साळवी, पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, शाम पवार, शिला पाटील, रजनीताई केले, साहित्यिक कृष्णा पाटील, शरद धनगर, रेखा पाटील, सुनिता पाटील, सुभाष पाटील घोडगावकर, हिरामण कंखरे, शाम अहिरे, मनोज पाटील, गोकुळ बोरसे, भागवत सूर्यवंशी, सुलोचना वाघ, नयना पाटील, माधुरी पाटील, विनोद पाटील, प्रदीप अग्रवाल, ब्रह्मकुमारी विद्यादेवी, डॉ.रामलाल पाटील, पूनम साळुंखे, डॉ.चंद्रकांत पाटील, हरि भिका वाणी, बजरंग अग्रवाल आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, सूत्रसंचालन शरद सोनवणे तर आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025

    Amalner : श्रीमंत प्रताप शेठ यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त प्रताप महाविद्यालयात अभिवादन

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.