पाचोरा तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमाचा प्रारंभ

0
28

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील भोजे आणि पिंपळगाव हरेश्वर येथे विठ्ठल धुमाळ पाटील, जळगावचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, रावेरचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, युवा सेनेचे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमात मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करण्यात आला.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते. त्यामुळे दहा वर्षाच्या काळात जनतेचा भ्रम निराश झाला आहे. मतदार राजांची घोर फसवणूक झाली आहे. महाराष्ट्रात महाआघाडीचे शासन होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी बिना अटी शर्तीची सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. कापूस व इतर पिकांना हमीभाव दिले. कोरोनामुळे जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावून लाखो नागरिकांचे त्यांनी प्राण वाचविले. औषधोपचार ऑक्सिजन पुरवून उपलब्ध करून सुनियोजित बंदाचे नियोजन करून कोरोना महामारी सोबत यशस्वी लढा दिला. त्यामुळे ते जगातील आदर्श मुख्यमंत्री ठरले. मात्र, भाजपाने कटकारस्थान करून सत्तांतर घडवून महापाप केले. आगामी २०२४ मध्ये पापाचा बदला घ्यावा लागेल. भाजपापासून देशाला वाचवावे लागेल. भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊ या, असे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी विनोद बाविस्कर, अनिल सावंत, पप्पू राजपूत, मिथुन वाघ, चंद्रकांत पाटील, अरुण तांबे, प्रितेश जैन, राजा बाबू, देविदास पाटील, अण्णा परदेशी, भगवान पाटील, अजय तेली, प्रशांत पाटील, कैलास परदेशी, गोकुल परदेशी, गजानन पोतदार, जगदीश परदेशी, सतीश मराठे, अमोल राठोड, लकीचंद पवार, सुभाष पाटील, विरेंद्रसिंग देशमुख, भूषण नैनाव, भारत परदेशी, ईश्वर पाटील, विलास राजपूत, विश्वनाथ तेली, राजेंद्र देशमुख, अतुल सूर्यवंशी, राहुल चौधरी, राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक उद्धव मराठे तर सूत्रसंचालन राजेंद्र राणा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here