राहुल गांधींची अध्यात्मिक भेट; सुवर्ण मंदिरामध्ये घासली भांडी

0
27

अमृतसर : वृत्तसंस्था

आज देशभर गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला भेट दिली. येथे त्यांनी गुरबानी किर्तन ऐकले तसेच सामुदायिक सेवाही प्रदान केली.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने चर्चेत येत आहेत.कधी ट्रकमधून प्रवास तर कधी गॅरेजमध्ये भेट दिल्याचे त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले. भारत जोडो यात्रेमुळेही ते अनेकापर्यंत पोहोचले. दरम्यान, त्यांचा आजचा एक व्हिडीओही चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी यांनी गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन भांडी घासली आहेत.
डोक्यावर निळा स्कार्फ घालून राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात स्वयंसेवक सेवेचा भाग म्हणून त्यांनी भांडी घासली. एवढेच नव्हेतर, राहुल गांधी आज पंजाबमध्येच राहणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here