साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नवोदित साहित्यिक कवी, कवयित्रींसाठी मंडळातर्फे डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या रविवारी अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रविवारी होऊ घातलेल्या खान्देशस्तरीय संमेलनात सहभागी होण्यासाठी दोन कविता फोटोसह बायोडाटा मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी.पाटील यांच्या पत्त्यावर पाठवाव्यात. कविता पाठविण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबरपर्यंत आहे.
कविता आणि आपले प्रकाशित पुस्तके, कथा, कविता, कादंबरीची एक प्रत बाय पोस्ट डी.डी.पाटील, संस्थापक-अध्यक्ष जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ, जामनेर, ५५/१ शारदा सदन, लक्ष्मी कॉलनी, वाकी रोड, जामनेर, ता.जामनेर, जि.जळगाव, पिन कोड नंबर-४२४२०६ या पत्त्यावर पाठवाव्यात. यासाठी संबधितांनी ८७८८२६०५६० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.