आमडदे शाळेत तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता

0
19

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

कर्मवीर तात्यासाहेब आणि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, आमडदे शाळेत संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचा सांगता समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व भडगाव तालुका शेतकरी संघाचे प्रेसिडेंट प्रतापराव पाटील होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव तथा मुंबई येथील मंत्रालयातील उपसचिव प्रशांतराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा तथा जळगाव जिल्हा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पूनम पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सचिव तथा कै. दिनानाथ दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन जगदीश पाटील तसेच जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम, डॉ. गिरीश देसल, भडगावचे विस्तार अधिकारी गणेश पाटील, पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, संस्थेतील विविध शाळांचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन, संचालक मंडळ, संस्थेतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील प्रांगणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याठिकाणी सुरुवातीला दहावी बच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर विद्येची देवता शारदा माता कर्मवीर तात्यासाहेब कै. ताई आजी कै.साधनाताई पाटील, कै.युवराज दादा पाटील, कै. अशोक अण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण प्रतापराव पाटील, प्रशांत पाटील, डॉ. पूनम पाटील, जगदीश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेतील सर्व मान्यवर, प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचे स्वागत आणि सत्कार विद्यालयाच्यावतीने विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.वळखंडे, प्राथमिक मुख्याध्यापक विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेत कर्मवीर तात्यासाहेब यांचा २२ वा पुण्यस्मरण सप्ताह २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत विविध स्पर्धा सर्व शाळांमध्ये घेण्यात आल्या. त्या मागचा उद्देश विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.वळखंडे यांनी प्रास्ताविकातून मांडला. कर्मवीर तात्यासाहेब यांच्या जीवनपट विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आर.टी.पाटील यांनी आणि भडगाव येथील इंग्लिश मीडियमचे समन्वयक सुरेश गुजेला यांनी शिक्षक मनोगतातून सांगितला. कार्यक्रमातून कर्मवीर तात्यासाहेब यांचे रेखाचित्र लाडकुबाई विद्यामंदिर, भडगाव शाळेचे उपशिक्षक शरद पाटील यांनी स्वहस्ताने रेखाटून आदरणीय नानासाहेब यांना भेट दिले. त्याबद्दल त्यांचा सत्कार मंत्रालयातील उपसचिव प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

एक तरी गुण प्रत्येकाने आत्मसात करण्याचे आवाहन

अध्यक्षीय भाषण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.पूनम पाटील यांनी केले. त्यातून कर्मवीर तात्यासाहेब यांच्या सोहळ्यानिमित्त त्यांचा एक तरी गुण प्रत्येकाने आत्मसात करावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. यानंतर राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन प्रशांत सोनवणे तर आभार संजू सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे छायाचित्रण व शब्दांकन दत्ता भोसले, स्वप्नील पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.वळखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here