साईमत जळगाव प्रतिनिधी
नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीड़ा संकुल येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या बळावर विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या विशाल ज्ञानेश्वर पवार व सुमेध सुशांत पाटिल या दोघा विद्यार्थ्यांची विभागीय निवड चाचणी स्पर्धेत निवड होवून पालघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेसाठी राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडुचे शालेय व्यवस्थापन मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटिल , ज्येष्ठ शिक्षक जगदीश चौधरी, विभाग प्रमुख राजेंद्र पाटिल, सूर्यकांत पाटिल, सर्व क्रीड़ा शिक्षक यांनी अभिनंदन केले. दोघा विद्यार्थ्यांना राष्ट्रिय व्हॉलीबॉल प्रशिक्षक क्षितिज सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.