तुकाराम माळी पतसंस्थेच्या सभासदांना भेटवस्तूसह लाभांशचे वाटप

0
41

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून आकर्षक चादर व लाभांशचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी भाजपचे लोहारा-कुऱ्हाड जिल्हा परिषद गटाचे गटनेते संजय पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून आकर्षक चादरचे वाटप करण्यात आले. यावेळी तुकाराम माळी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी संजय पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम गायकवाड यांचा मुरलीधर गिते यांनी सत्कार केला. संस्था स्थापनेपासून सभासदांना दरवर्षी लाभांश देत आहे. मागीलवर्षी लाभांशसोबत चांदीचे नाणे व यंदा लाभांश व आकर्षक चादर प्रत्येक सभासदांना मिळणार आहे. तसेच सभासदांना लाभांश व भेटवस्तू देणारी लोहारा पंचक्रोशीतील एकमेव पतसंस्था असल्याचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी सांगितले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, विकासोचे चेअरमन सुनील क्षिरसागर, संचालक प्रभाकर चौधरी, शिवराम भडके, विवेक जाधव, विजय पालीवाल, ज्ञानेश्वर माळी, ज्ञानेश्वर चौधरी, देवानंद भोई, वंदना बनकर, सुनंदा गिते, हिरालाल जाधव, विठ्ठल बनकर, सुभाष माळी, मुरलीधर गिते, महेंद्र शेळके, नितीन परदेशी यांच्यासह सभासद उपस्थित होते. चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांच्या नियोजनपूर्वक कारभारामुळे सर्व सभासदांना दरवर्षी लाभांश व दोन वर्षांपासून भेटवस्तू मिळत असल्याने सभासदांनी समाधान व्यक्त करीत संस्थेचे संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक चेअरमन डॉ. सुभाष घोंगडे, सूत्रसंचालन पत्रकार दीपक पवार तर आभार संस्थेचे सचिव रमेश सरोदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here