जातीपातीच्या खोल खड्ड्यात न पडता बंधूभाव जोपासावा

0
20

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

हिंदू -मुस्लीम, सिख्ख, ईसाई असा कोणताही भेद न करता मानवता हा एकच धर्म असल्याची शिकवण आपल्यात रुजली पाहिजे. मोठ्यांचा आदर, एकमेकांविषयी जिव्हाळा, बालकांवरील प्रेम हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. हे थांबवून जातीपातीच्या खोल खड्ड्यात न पडता बंधू भाव जोपासावा, असे प्रतिपादन सूरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांनी केले. चोपडा येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुरमाज फाउंडेशनच्यावतीने ईद-ए-मिलादनिमित्त ५० आदिवासी विद्यार्थिनींना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी अबुल्लैस शेख, मुराद भाई, झियाउद्दीन काझी साहब, डॉ.एमडी रागीब, शोएब शेख, जुबेर बेग, शुभम भाई, इम्रानभाई पलंबर, अब्दुल कादिर, डॉ.मोहम्मद ज़ुबेर शेख, समाधान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शुभम सोनवणे, पत्रकार महेश शिरसाठ, वसतीगृह अधीक्षिका कावेरी कोळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here