साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत निघून गुलालाची उधळण करत गणेशाला उत्साहात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…’ च्या गजरात पाचोरा येथील मिरवणूक काढून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन उत्साह शांततेत पार पडले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरातील जामनेर रोड मस्जिद जवळ, हुरसेंनी चौक, आठवडे बाजार यासह शहरातील मुख्य मार्गांवरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल, ताशे, बँडसह विविध वाद्यांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगे, राहुल मोरे, विजया विसावे, राहुल बेहरे, विनोद बेलदार, गजानन काळे, श्याम पाटील, सुनील पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील, प्रकाश पाटील, होमगार्ड चंद्रकांत महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कल्पेश पाटील, अमोल सोनवणे, राजू पाटील, पोलीस आदींसह होमगार्ड कर्मचारी बंदोबस्तात सहभागी झाले होते.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडळानी फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. यावेळी माजी आ.दिलीप वाघ, संजय वाघ, भूषण वाघ , शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, उद्धव मराठे, अनिल सावंत, भरत खंडेलवाल, ॲड.अविनाश भालेराव, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत दुसऱ्या दिवशी काही गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळे नागरिकांचे सहकार्य लाभले. भावपूर्ण वातावरणात, बँड व ढोल-ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत निरोप दिला.
भाविकांनी दिला बाप्पांना निरोप
पाचोरा शहरातील कृष्णापुरी, लेझीम मित्र मंडळ बाहेरपुरा, पंचमुखी हनुमान चौक भगवे वादळ मित्र मंडळ, श्रीराम चौक मित्र मंडळ, आठवडे बाजार, नवक्रांती मित्र मंडळ, श्री बालाजी मित्र मंडळ, रंगारगल्ली मित्र मंडळ, सराफ बाजार मित्र मंडळ, लोकमान्य टिळक मित्र मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ यासह सर्व गणेशोत्सव शांततेत पार पडला. विसर्जन मिरवणुकीत तरुणाईसह ज्येष्ठांचाही उत्साह लक्षणीय ठरला.