साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील सुमंगल महिला मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित मोदक स्पर्धा तसेच भारतीय सण उत्सवावर आधारित रांगोळी स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या.
मोदक स्पर्धेत प्रथम प्रिया वाणी, द्वितीय रुपाली शिरोडे, तृतीय पुष्पा येवले तर उत्तेजनार्थ संगीता कोठावदे, माधुरी कोठावदे, रत्नप्रभा अमृतकर यांनी बक्षीस पटकावले. तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम प्रीती कोतकर, द्वितीय रत्नप्रभा येवले, तृतीय नीलिमा शिरोडे, फुलांची रांगोळी सुजाता कोतकर तसेच उपस्थित सर्व सखींसाठी ‘होम मिनिस्टर’ खेळ घेण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक पैठणीचा मान शुभांगी येवले, द्वितीय दीपाली येवले, तृतीय सुजाता पाखले यांनी पटकाविला. मोदक स्पर्धेसाठी ज्योती पटेल आणि रांगोळी स्पर्धेसाठी कुमुदिनी नारखेडे यांनी परीक्षण केले.
बक्षीस वितरण मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी अध्यक्षा सुरेखा शिरोडे, सुरेखा येवले, सरला वाणी, लता येवले, वैशाली मराठे, भारती बावीस्कर, रोहिणी येवले, सुजाता पाखले, डॉ.सोनाली कोठावदे, चारूशीला पाटे यांनी परिश्रम घेतले. प्रतिभा नावरकर यांनी पैठणी प्रायोजकत्व करून सहकार्य केले. तसेच उज्ज्वला कोतकर, धनश्री कोतकर यांच्यातर्फे सर्वांना नमकीनचा आस्वाद मिळाला.