चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध

0
37

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समस्त पत्रकार बांधवांबद्दल केलेले विधान पत्रकारांच्या जिव्हारी लागले आहे. त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे बुधवारी, २७ सप्टेंबर रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच प्रांताधिकारी भूषण अहिरे आणि पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले. निवेदन पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, राहुल मोरे यांनी स्विकारले.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा व निवेदन देतेप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहराध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, पत्रकार विनायक दिवटे, संदीप केदार, चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश रावळ, सचिन गोसावी, प्रवीण बोरसे, दिलीप जैन, विजय पाटील, शांताराम चौधरी, अनिल येवले, योगेश पाटील, भुवनेश दुसाने, निखिल मोरे, राहुल महाजन, सुनील कोळी, दिलीप परदेशी, गजानन गिरी, किरण अहिरे, राकेश सुतार, भिकन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

यांनी दर्शविला पाठिंबा

निषेधला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना, महिला आघाडी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दीपक परदेशी यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here