साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सतत ८ दिवसांपासून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण करण्यात आले. चाळीसगावचे तहसिलदारद्वारा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून साखळी उपोषणाची टाळ, मृदुंगाच्या गजरात सांगता करण्यात आली.
चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर संविधानिक पध्दतीने सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २० ते २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत सतत ८ दिवस साखळी उपोषण करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद, डफ बजाओ, टाळ मुदुंग वाजवून आंदोलन करण्यात आले. अद्यापही शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावा, असे न झाल्यास येणाऱ्या काळात मराठा समाज सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, एकाही मंत्री व नेत्यांना चाळीसगाव तालुक्यात फिरु देणार नाही. तसेच एक महिन्यात मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास राज्यभर मराठा समाजाच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्र्यांना चाळीसगावचे तहसिलदारद्वारा दिलेल्या निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
उपोषणात गणेश पवार, दिलीप पाटील, खुशाल पाटील, प्रा.चंद्रकांत ठाकरे, प्रमोद पाटील, मनोज भोसले, विजय (पप्पू) पाटील, सुदर्शन देशमुख, प्रदीप देशमुख, राजेंद्र पाटील, गोकुळ पाटील, संजय देशमुख, खुशाल बिडे, नाना शिंदे, संजय पाटील, प्रदीप मराठे, पी.एन.पाटील, धनंजय देशमुख, सुनील चव्हाण, किशोर पाटील, आर.बी.जगताप, अनिल पाटील, शिवाजी देशमुख, बाळासाहेब देशमुख, मंगेश वाबळे, विजय शितोळे, प्रा.काकासाहेब निकम, शेखर देशमुख, मालती जगताप, सोनाली बोराडे, मनीषा पाटील, अनिता चव्हाण, लिलाबाई पाटील, निलेश गायकवाड, तेजस गायकवाड, भैय्यासाहेब पाटील यांनी भावगिते स्वरांजलीमध्ये गायन केल्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण तयार झाले होते. साखळी उपोषणाला आम आदमी पार्टीचे अध्यक्ष ॲड.राहुल जाधव, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, संगणक परीचालक ग्रामपंचायत पाठिंब्याचे पत्र दिले. प्रिंप्रीचे उपसरपंच राजेंद्र मोरे, नगरसेवक दीपक पाटील, सोमसिंग राजपूत तसेच संतोष राजपूत यांनी पाठिंबा दर्शविला.