इंदिराबाई ललवाणीची अनामिका वनारसेची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

0
27

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे येवला येथे घेण्यात आलेल्या १९ वर्ष आतील मुली विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत ७६ किलो वजन गटात इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची १२वी विज्ञान शाखेतील पहेलवान अनामिका सुरेश वनारसे हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव किशोर महाजन यांच्या हस्ते विद्यालयाच्यावतीने ट्रॅक-सूट (किट), रोख ५०१ रुपये भेट देऊन तिचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, बी.पी.बेनाडे, गजानन कचरे, प्रा.समीर घोडेस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. अनामिकाला क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here