साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात यंदा तब्बल १०० पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली आहे. अनंत चतुर्दशीला दोनच दिवस राहिल्याने भाविकांची आरास पाहण्यासाठी गर्दी वाढतच आहे. गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी गणपतीचे विसर्जन होणार आहे. शेवटच्या दोन दिवस अगोदर भक्तांची प्रचंड गर्दी वाढली आहे. रथगल्ली बालाजी मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा समाज प्रबोधनावरही देखावा दाखविण्यात येत आहे. यासोबतच खेळणीसह खाद्य पदार्थ विक्रेत्यांचाही व्यवसाय वाढला आहे.
शहरातील अनेक गणेश मंडळांनी बोध देणारे देखावे आणि संदेश सादर केले आहे. काही मंडळांनी शिक्षणावर भर दिला आहे. याशिवाय स्वच्छतेचाही संदेश देण्यात आला. शहरात ग्रामीण भागातून नागरिक गणपती पाहण्यासाठी येत असतात. मात्र, त्यांना रस्त्यावर खड्ड्यांचा लाईट नसल्याने अंधाराचा सामना करावाच लागत आहे.
पोलिसांची चोरट्यांवर नजर
भाविकांची गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनातर्फे प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त लागला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे फिरत असल्याने पोलिसांकडून चोरट्यांवर नजर ठेवली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रत्येक गणेश मंडळाजवळ कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. कर्तव्यावर आहेत की नाही? त्याची शहानिशा करण्यासाठी पथकही तयार केले आहे. तसेच अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लागले आहे. याठिकाणी भाविक विविध पदार्थांचा आस्वाद घेत आहे. त्याचबरोबर खेळणी विक्रेतेही रस्त्याच्या कडेला रात्री उशिरापर्यंत दिसून येत आहे. याकडे लहान मुलांचे लक्ष सहज वेधले जात असून खेळण्याची विक्री चांगली होत असल्याने विक्रेत्यांचा व्यवसाय वाढला आहे. ठिकठिकाणी मंडळांतर्फे विद्युत रोषनाई केल्याने लक्ष वेधून घेतले आहे.