साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
कुंभार समाज बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.मंगेश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यासाठी जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील दहावी, बारावीत ६० टक्क्यांच्यावर गुण मिळालेले विद्यार्थी तसेच पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, आयटीआय उत्तीर्ण, डॉक्टर इंजिनियर्स, फार्मसी, एम.बी.ए., अन्य उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत शुक्रवारी, ६ ऑक्टोबरपर्यंत जमा करावी. तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी सरकारी, निमसरकारी सेवेतून सेवानिवृत्त समाजबांधव, शैक्षणिक सामाजिक क्षेत्र संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या समाजबंधूनीही आपली नावे आयोजकांकडे कळवावीत.
गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत उत्तमराव काळे (९८५०१९९९१८), अविनाश करनकाळ, राहुल बोरसे (९९६०९३०९१५), अशोकराव वाघ, हिरामण करनकाळ यांच्याशी संपर्क करुन जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.