साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश व्हावा म्हणून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सहाव्या दिवशी घंटानाद केला. साखळी उपोषणाला नगरसेवक भगवान राजपूत, रामचंद्र जाधव, रोशन जाधव यांनी पाठिंबा दर्शविला. चाळीसगाव तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला भगिनी, विद्यार्थ्यांनी २६ ते २७ सप्टेंबरपर्यंत साखळी उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर २५ सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद करण्यात आला. उपोषणात गणेश पवार, प्रमोद पाटील, खुशाल पाटील, कुणाल पाटील, दिलीप पाटील, नाना शिंदे, मनोज भोसले, समाधान पाटील, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, सुधाकर वाघ, सुमित कापसे, खुशाल बिडे, अशोक भोसले, किशोर देशमुख, एन.एम.पाटील, राजेंद्र पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, आर.बी.जगताप, सुधीर पाटील, पी.एन.पाटील, धनंजय देशमुख, समाधान बच्छाव, विजय देशमुख, मनोहर सूर्यवंशी, चेतन देशमुख, प्रदीप मराठे, संजय देशमुख, शेखर देशमुख, सागर देशमुख, उमेश देशमुख, किशोर पाटील, मुकुंद पवार, राकेश राखुंडे, किरण आढाव, नाना तांबे, ज्ञानेश्वर कोल्हे, संजीव पाटील, दीपक चव्हाण, पोपटराव वाबळे, राहुल शिंदे, अमोल पाटील, अनिकेत चव्हाण, नंदकिशोर पाटील, संजय देशमुख, डी.एस.मराठे, संजय मांडोळे, पदमाकर पाटील यांच्यासह सोनाली बोराडे, मिनाबाई सूर्यवंशी सहभागी झाले होते.