आमडदेला हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन

0
43

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे शाळेत संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरी पाटील होते. यावेळी शारदा माता, कर्मवीर तात्या बाबा, कै. ताई आजी स्व. साधनाताई पाटील, कै.युवराज दादा पाटील, कै. अशोक अण्णा पाटील आदींच्या प्रतिमेच्या पूजनासह माल्यार्पण तसेच श्रीफळ वाहून कार्यक्रमाचे नानासाहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र पाटील, धर्मराज पाटील, किशोर पाटील, रमेश पाटील, नारायण पाटील, जयवंत पाटील, लीलाधर पाटील तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर.आर. वळखंडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आनंद मेळाव्याचे’ उद्घाटन
कर्मवीर तात्यासाहेब यांचा जीवनपट विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक वाय.एम.देसले यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला. याप्रसंगी ‘आनंद मेळाव्याचे’ उद्घाटन फीत कापून नानासाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आनंद मेळाव्यात पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांचा संपूर्ण सहभाग असल्याने विविध पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. सर्व स्टॉलला नानासाहेब आणि मान्यवरांनी भेटी देऊन सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुतळ्याचे पूजनासह माल्यार्पण रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक प्राचार्य आर.आर.वळखंडे, सूत्रसंचालन प्रशांत सोनवणे तर आभार संदीप सोमवंशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य आर.आर.वळखंडे, पर्यवेक्षक आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here