साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या आंतरशालेय १७ वर्षातील फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या अटातटीच्या स्पर्धेत ‘पोद्दार’ इंटरनॅशनल स्कूलने सेंट लॉरेन्सचा १-० ने पराभव केला तर मुलींच्या स्पर्धेत ‘ओरियन स्टेट’च्या मुलींनी ‘पोद्दार’ इंटरनॅशनलचा पेनल्टीमध्ये २-१ ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. विजेते व उपविजेते संघांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस, जळगावतर्फे चषक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पारितोषिक वितरण जळगाव नगरीचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक, आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष अमृता नेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव फारूक शेख, कार्याध्यक्ष डॉ.प्रा.अनिता कोल्हे, सहसचिव अब्दुल मोहसीन, क्रीडा शिक्षिका छाया बोरसे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल असा
मुलांमध्ये पोद्दार वि.वि एसव्हीकेएम (एम जे). ४-२, ओरियन सीबीएससी वि.वि सेंट जोसेफ ४, पोद्दार वि.वि इकरा शाहिन ५-४ (पेनल्टी), सेंट टेरेसा वि.वि ओरियन सीबीएससी १-०, अंतिम सामन्यात पोद्दार वि.वि सेंट टेरेसा १-०, मुलींमध्ये ओरियन सीबीएससी वि.वि न्यू इंग्लिश आर.आर. ४-३ (पेनल्टी), रोजलँड वि.वि मिल्लत १-०, ओरियन स्टेट वि.वि रायसोनी इंग्लिश ४-२, पोद्दार वि.वि एनसीबीएससी १-०, गोदावरी वि.वि सेंटजोसेफ १-०, रोझलँड वि.वि एल.एच.पाटील २-०, ओरियन स्टेट वि.वि गोदावरी २-०, पोद्दार वि.वि रोज लँड २-०, अंतिम सामन्यात ओरियन स्टेट वि.वि पोद्दार २-१ (पेनल्टी) असा निकाल जाहीर करण्यात आला.