साईमत रावेर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी कार्य करीत आहे. समाजात उपेक्षित घटक असलेल्या दिव्यांग बांधवांच्या जिवनात प्रकाश आणण्यासाठी कार्य मोदींनी केली आहे.त्या़ंच्यामुळे दिव्यांग बांधवांना मिळालेल्या या साहित्या सहाय्याने आत्मनिर्भर जिवन जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त “सेवा साप्ताह ” अंतर्गत भारत सरकार एडीआयपी योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार अंतर्गत दिव्यांग बांधवांना निःशुल्क साहायक उपकरण वितरण पसंगी खा. रक्षाताई खडसे रावेर येथे बोलत होत्या.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी मंत्री आमदार सजंय सावकारे, आमदार शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रावेर लोकसभा जिल्हा निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन, प्रांतधिकारी कैलास कडलग, तहसिलदार बंडू कापसे, भाजपा जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, अशोक कांडेलकर, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर लोकसभा संयोजक सुनिल पाटील, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुलकर, शहराध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, सि एस पाटील, पि के महाजन यांच्यासह मोठ्यासंख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मतदारसंघातुन आलेल्या दिव्यांग बांधवांना यावेळी विविध साहायक उपकरण वितरीत करण्यात आले.