साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवानिमित्त गणेश विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. ते अंतिम टप्प्यात आलेले आहे. मनपा प्रशासनातर्फे श्री गणेश विसर्जन मार्गावरील हाती घेण्यात आलेले रस्ता दुरुस्तीची कामे व खड्डे बुजविण्याची कामे सुरु असलेल्या ठिकाणावरील रस्त्यांना प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी शहर अभियंत्यांसमवेत भेट देऊन रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
श्री गणेश विसर्जनानंतर जळगाव शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ते दुरुस्तीचे कामे प्रशासनातर्फे घेण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच ज्या रस्त्याचे कार्यादेश सार्वजनिक विभागाकडे आहेत. ते रस्ते त्यांनी तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह मनपामार्फत त्यांना देण्यात आल्या आहेत.