साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेतंर्गत कार्यरत असलेल्या महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त ‘मी सावित्री बोलतेय’ हा प्रा. मिनाक्षी वाघमारे यांचा एकपात्री प्रयोग शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेत आयोजित केला होता.
याप्रसंगी जळगाव येथील एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाच्या प्रा.मिनाक्षी वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली. त्यांनी प्रयोग सादर करतांना सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. सावित्रीबाई यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यास अनुसरून भूमिका सादर केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका प्रा.मधुलिका सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील, डॉ. आर.आर. चव्हाण, डॉ. अतुल बारेकर, प्रा. नेरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरव हरताळे याने केले. यावेळी व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिंनी उपस्थित होते.
