साईमत बोदवड प्रतिनिधी
तालुक्यातील जामठी परीसरात शुक्रवारी ढगसदृश्य पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने जामठीसह परिसरात धुमाकूळ घातला आहे. जामठी, लोणवाडी, येवती, रेवती, धोंडखेडा, कुर्हा हरदो अश्या अनेक गावात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे.
दरम्यान, लोणवाडी गावात अनेक घरात पाणी शिरलं आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला आहे. लोणवाडीतील 20 घरं पाण्याखाली गेले आहेत. घरात पाणी शिरल्यानं सर्व संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले असून, मोठं नुकसान झाले आहे.
लोणवाडीत पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी घरांचेही नुकसान झाले. या परिसरात शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.
पावसाचा शेतकऱ्यांना फटका
जामठीसह परीसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस झाल्याने. या पवासामुळे शेतात पाणी साचले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन, कापूस,मका,तुर आणि बाजरी या पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळे बळीराजा हातबल झाला आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
सोयाबिन, कपाशी,मका सह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. अगोदरच पावसाने हाहाकार केलेला असताना पहाटे चार वाजेच्या विजेच्या कडकडाटासह सुरू झालेला पावसाने परिसरातील सर्व गावांमध्ये ओढेनाले एक झाले. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले.
नुकसानीचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश
जामठीसह लोणवाडी परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार करीत शेतकऱ्यांसह , रहिवाशांचे अतोनात नुकसान केले आहे याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार श्री मयुर कडसे यांनी दिले आहे.
जामठीसह लोणवाडीत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने अतोनात नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील कृ.उ.बा.संचालक रामदास पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष दिपक माळी यांनी भेटी दिल्या आहेत.