साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरातील एका भागात राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुकलीसोबत मावशीच्या पतीने अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मावसावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील एका भागात ८ वर्षीय चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी, २० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिमुकलीच्या मावशीच्या पतीने तिला जवळ ओढून तिच्या सोबत अश्लिल चाळे केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.