साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथील स्वप्नील राजेंद्र जाधव ह्या तरुणाने कुस्ती स्पर्धेत जिल्हा पातळीवर विजय मिळविल्याने त्याची आता विभागीय स्तरावर निवड झाली आहे. १९ वर्ष वयोगटातील व ६१ किलो वजन गटात ही निवड झाली आहे. त्यामुळे त्याला आता विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. स्वप्नीलने सुमनबाई गिरीधर पाटील ह्या महाविद्यालयाकडून कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. त्याला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सचिन भोसले, ग्रा.पं.सदस्य समाधान पवार, राजेंद्र जाधव, कोळगावचे माजी सरपंच अनिल बिऱ्हाळे, विनोद वाकोडे, दामू वाकोडे, वैभव बोरसे, राज वाकोडे, निलेश जाधव, कुणाल राजपूत, कल्पेश बोरसे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे कजगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.