साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ओबीसी आरक्षणासाठी साखळी उपोषणाचा ३ दिवस सुरु आहे. तिसऱ्या दिवशी उपोषणास उद्योजक तथा ज्येष्ठ समाजसेवक वर्धमान धाडीवाल यांनी नुकतीच भेट दिली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. वर्धमान धाडीवाल, रामलाल मिस्तरी, गणेश गवळी, योगेश पाटील, विजय गायकवाड, सागर आगोने, पत्रकार मुराद पटेल यांनी उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.