साईमत, जामनेर : प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ आयोजित स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलमधील आठवीची विद्यार्थिनी अक्षरा विजय सैतवाल हिने राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला. ‘निसर्ग एक कलावंत’ हा तिच्या निबंधाचा विषय होता. राज्यभर नावलौकिक असलेली ही शालेय जीवनातील महत्त्वाची अशी स्पर्धा आहे. तिला संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम पाचशे रुपये, पुस्तके व स्मृतीचिन्ह नुकतेच प्रदान करण्यात आले. याप्रसंगी साहित्यिक रोमा नारखेडे, अण्णासाहेब बेंडाळे यांच्यासह संस्थेचे संचालक उपस्थित होते.
अक्षरा ही मालदाभाडी शाळेचे वृक्षमित्र विजय सैतवाल यांची सुकन्या आहे. तिला समिती प्रमुख एस. एस. शिसोदे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पारसनाथ ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सैतवाल, रोहिणी इंधाटे, गणेश धांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एन. नरवाडे, व्ही.डी.पाटील, एम.पी. सावखेडकर, आर.डी.येवले यांनी कौतुक केले आहे.