साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील रोटरी जळगाव परिवारातर्फे एमकेसीएल यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक प्रकल्पाच्या निमित्त ४७ मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र प्रदान करून नुकताच गौरव करण्यात आला.
मायादेवी नगरातील रोटरी भवनमध्ये रोटरी साक्षरता महिना व सप्टेंबर महिन्यातील शिक्षक दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमास रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल, डॉ.राजेश पाटील, रोटरी वेस्टच्या अध्यक्ष सरीता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी, एमकेसीएलचे बडगुजर, प्रवीण जाधव, अक्षय गादिया उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. राजेश पाटील, सूत्रसंचालन शिल्पा सफळे तर प्रा. राजेंद्र देशमुख यांनी आभार मानले.