खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे अमोल किर्तीकरांविरुध्द गुन्हा दाखल

0
53
खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे अमोल किर्तीकरांविरुध्द गुन्हा दाखल-saimatlive.com

मुंंबई साईमत प्रतिनिधी

कथित बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. यानंतर कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. अमोल किर्तीकर हे ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्ती मानले जातात.आर्थिक गुन्हे शाखेकडून अमोल किर्तीकर यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांंचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, नियोजन विभागाचे तत्कालीन सहआयुक्त, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंट राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार, कर्मचारी आणि स्नेहा कॅटरर्स, बीएमसीचे अधिकारी आणि इतर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांंचे सुपुत्र अमोल किर्तीकर आहेत. कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाचे आमदार रविंंद्र वायकर यांच्याविरुध्द जोगेश्वरीतील भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांंची चौकशी सुरु असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here