साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद जळगावद्वारा आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील माध्यमिक शाळेचे ३२ संघ सहभागी होते. त्यातून द्रौ.रा.कन्या शाळेच्या १४ वर्षाआतील मुली या गटातील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेते पद मिळविले. उपविजेते पद ग्लोबल इंग्लिश मीडियम शाळेला मिळाले. द्रौ.रा.कन्या शाळेच्या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंचे शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही. एम.पाटील, ज्येष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर, एस.एस. माळी, करुणा शिक्षक डी.एन.पालवे, पी.व्ही.साबे, बी.एस.पाटील यांनी कौतुक केले आहे. शाळेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका आर.एस.सोनवणे, क्रीडा शिक्षक जे.व्ही.बाविस्कर यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.
स्पर्धेत यांचा होता सहभाग
स्पर्धेत मानसी पवार, दर्शना पाटील, रिद्धी संदानशिव, प्राची महाजन, भाग्यश्री सूर्यवंशी, अनुष्का चौधरी, लक्ष्मी बंजारा, खुशी पाटील, परी शेटे, दिक्षिका पाटील, मृनल पाटील, अश्मीरा शेख यांचा सहभाग होता.