साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी बनवि लेल्या पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ शिक्षकेतर कर्मचारी रामराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. शालेय सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शरद पाटील यांनी प्राणप्रतिष्ठाचे मंत्रोच्चारण केले. आठवीचे विद्यार्थी दीपक पाटील, रोहित पाटील आणि नयन पाटील यांनी कलाशिक्षिका पी.सी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूमातीपासून गणपतीच्या सुबक मूर्त्या बनवून स्थापना केली. सांस्कृतिक मंडळ आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाची आरास सजविली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी गणपतीच्या आरतीला उपस्थिती दिली.