साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित प्रकरणाची पोलीस प्रशासनाच्यावतीने चौकशी करून लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंहजी देशमुख यांच्याकडे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा चाळीसगावच्यावतीने सोमवारी, १८ रोजी निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत्या ८ दिवसात चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर गणेश पवार, अरुण पाटील, प्रमोद पाटील, श्याम देशमुख, विजय (पप्पू) पाटील, प्रदीप देशमुख, गोरख साळुंखे, खुशाल पाटील, नाना शिंदे, तमाल देशमुख, संजय कापसे, विलास मराठे, राजेंद्र पाटील, गोविंदा चव्हाण, मुकुंद पवार, भरत नवले, छोटु अहिरे, योगेश पाटील, प्रदीप मराठे, उदय भोसले, भूषण खालकर, प्रयास देशमुख, रवींद्र मोरे, श्रीकांत तांबे, शिवाजी गवळी, स्वप्नील गायकवाड, भूषण चव्हाण, दीपक देशमुख, संदीप पवार, पवन पवार, भुपेश पाटील, किरण देशमुख, विठ्ठल पवार यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.